गोपी टँक मार्केटचा पुनर्विकास पालिकाच करणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2017

गोपी टँक मार्केटचा पुनर्विकास पालिकाच करणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईच्या माहीम पश्चिम येथील पालिकेच्या गोपी टॅंक मार्केटच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली होती. मात्र विकासकाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्यामुळे पुनर्विकासाला देण्यात आलेली मान्यता रद्द करत पालिकेने या मार्केटची दुरुस्ती स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव पालिका प्रशासनाने बनवला असून सुधार समिती समोर मंजुरीसाठी सादर केला आहे.

माहिममधील सिटी लाईट सिनेमागृहासामोर २९२४.७७ चौरसमीटर क्षेत्रफळावर गोपी टॅंक मार्केट आहे. या मार्केटमध्ये १७१ परवानाधारक व ३०७ मासळी विक्रेते आहेत. या मंडईतील परवानाधारक गाळेधारकांनी श्री साईनाथ सहकारी व्यापारी संकुल संस्था स्थापन करून ७० टक्के लोकांच्या संमतीने मेसर्स ओंकार रिअल्टर्स डेव्हलपर्स यांची विकासक आणि दाभोळकर अॅण्ड दाभोळकर यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली होती. सन २००९ मध्ये मार्केटच्या पुनर्विकासाला पालिकेने मान्यता देत विकासकाला २००९ मध्ये इरादा पत्र दिले होते. त्यानंतर ३६ महिन्याचा कालावधी संपल्यावर पुन्हा २०१३ मध्ये पुनर्विकासाला मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतही २४ फेब्रुवारी २०१६ मध्ये संपली. यासंदर्भात ऑक्टोबर २०१६ मध्ये विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याबाबत सुनावणी घेऊन गोपी टँक मार्केटला देण्यात आलेले उद्देशपत्र रद्द करून या मार्केटचा पुनर्विकास तथा दुरुस्ती महापालिकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मार्केटच्या विकासासाठी विकासकाची नेमणूक केल्यानंतरही पालिकेने या मार्केटच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा खर्च केला आहे. वास्तविक पाहता हि जबाबदारी विकासकाची असल्याने पालिकेने या मार्केटवर खर्च केल्याने प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. यामुळे या प्रस्तावावर बुधवारी सुधार समितीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad