ABOUT US - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

ABOUT US

आमच्याबद्दल 
'जेपीएन न्यूज' हे मराठी आणि हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.

वेबसाइटसाठी लिहिण्याची संधी
वेबसाइटसाठी लिहिण्याची तसेच छायाचित्रकार बनण्याची संधी
जेपीएन न्यूज पोर्टल देश-विदेशातील लाखो मराठी तरूण-तरुणींचे अचूक व तत्पर बातमी मिळवण्याचे हमखास साधन आहे.जेपीएन न्यूज या न्यूज पोर्टल्सच्या माध्यमातून ऑनलाइन विश्‍वामध्ये तरुण वाचकांना लिखाणामध्ये सहभागी करावे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात येत आहे.

वेबसाइटसाठी तुम्ही काय लिहू शकाल?
बातम्यांवर, घटनांवर प्रतिक्रिया / तुम्ही जाणकार असलेल्या विषयावर लेख. / प्रवास वर्णन / विडंबनात्मक सद्यस्थितीवर भाष्य करणार्‍या कविता/ हिंदी, मराठी व इंग्रजी चित्रपटाचे परीक्षण / तुमच्या परीसरातल्या चांगल्या बातम्या / तुम्हाला माहित असलेल्या पण प्रसिद्धीचा झोत न लाभलेल्या मोठय़ा व्यक्तींची वा संस्थांची ओळख / अल्प-चरीत्र. / तुम्ही विदेशात असाल तर तिथल्या मराठी जगताच्या बातम्या, तिथले किस्से. भारतासाठी आदर्श ठरू शकेल असा विदेशातला अनुभव. / आकस, खालच्या पातळीवरील व्यक्तिगत टीका नसावी.

राजकारण, समाजकारण, क्रीडा, देश-विदेश, व्यापार, मनोरंजन आदी कुठल्याही विषयावर लेख लिहिण्याची मुभा आहे, मात्र लेखन अभ्यासपूर्ण असावे. / विनोदी, खिल्ली उडवणारे लेखन टोपणनावाने लिहिले तरी चालेल. / मजकूर पाठवताना संपूर्ण नाव व पत्ता आवश्यक. / केवळ युनिकोडमध्ये टाईप करून ई-मेल केलेल्या मजकुराचाच प्रसिद्धीसाठी विचार केला जाईल. / शब्द मर्यादा 300 ते 400.

याखेरीज तुम्ही काढलेल्या चांगल्या फोटोंनाही प्रसिद्धी देण्यात येईल. यामध्ये निसर्गाचे फोटो, कार्यक्रमाचे फोटो, बातमीमूल्य असलेले नागरी समस्यांचे फोटो तुम्ही पाठवू शकता. (फोटो सुस्पष्ट असावेत आणि शक्यतो 200 KB पेक्षा जास्त मोठे नसावेत.) तर, तरुण मित्र-मैत्रिणींनो बसा कम्प्युटरवर आणि तुमच्या मनाची भावना ई-मेलवर पाठवा.

"जेपीएन न्यूज" वेबसाईटचे सिटीझन जर्नालिस्ट व्हा !
तुम्हाला सामान्य माणसाची नाडवणूक दिसते ? तुमच्या आसपास बदल घडवून आणावा असं तुम्हाला मनापासून वाटतं ? शासनाची दिरंगाई तुम्हाला सहन होत नाही ? मग आमच्याशी संपर्क करा. जेपीएन न्यूज (वेबसाईट) बनेल लोकांचा आवाज. आमचे सिटिझन जर्नलिस्ट व्हा ! आपल्या बातम्या, लेख, छायाचित्र किवा इतर साहित्य विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा. CONTACT

Post Bottom Ad