Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईकरांना एसी लोकलचा फायदा - विनोद तावडे

मुंबई । प्रतिनिधी - बहुप्रतीक्षित एसी लोकल अखेर ख्रिसमस आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरु झाली. या एसी लोकलला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी हिरवा कंदील दाखवला. यावेळी बोलताना विनोद तावडे यांनी देशातील पहिली एसी लोकल सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. 'कार्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना आणि सर्वसामान्य मुंबईकरांना या लोकलचा फायदाच होईल,' असं ते म्हणाले. एसी लोकलचे दर जास्त नसल्याचा दावाही त्यांनी केला. कूल कॅबने महिन्यातून चारवेळा प्रवास केला तर जेवढा खर्च होतो त्यात एसी लोकलचा पास निघेल एवढे दर ठेवण्यात आल्याचंही ते म्हणाले. यावेळी खासदार किरीट सोमय्या, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार मनिषा चौधरी आणि माजी मंत्री भाई गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. २५ ते २९ डिसेंबरदरम्यान एसी लोकलच्या फेऱ्या प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहेत. तर १ जानेवारीपासून १२ फेऱ्या दररोज चालवल्या जातील. यातील ८ फेऱ्या फास्ट, ३ सेमी फास्ट तर १ फेरी स्लो असणार आहे. तर देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल. या एसी लोकलचं पहिल्या सहा महिन्यांसाठी कमीत कमी तिकीट ६० रुपये असून, जास्तीत जास्त तिकीट २०५ रुपये राहणार आहे. यात जीएसटीचाही समावेश असेल. तसंच या लोकलसाठी आठवड्याचा, पंधरवड्याचा आणि मासिक पासही उपलब्ध असणार आहे. इतर लोकलप्रमाणेच महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी या लोकलमध्ये राखीव जागा या लोकलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या लोकलमधील पहिला आणि बारावा डबा महिला प्रवाशांसाठी राखीव असेल. स्वयंचलित पद्धतीचे दरवाजे असल्याने त्याबाबत वारंवार उद्घोषणा केली जाणार आहे.

चौकट - 
२९ डिसेंबरपर्यंतचे वेळापत्रक 
शनिवार रविवार ट्रेन बंद असेल. 
चर्चगेट स. ९.३० वा. बोरिवली स. १०.१७ वा.
चर्चगेट स. ११.१५ वा. बोरिवली दु. १२.०२ वा.
चर्चगेट दु. १.१६ बोरिवली दु. १.५७ वा.
बोरिवली स. १०.२० चर्चगेट स. ११.१० वा.
बोरिवली दु. १२.२४ वा. चर्चगेट दु. १.१३ वा.
बोरिवली दु. २.११ चर्चगेट दु. ३.११ वा.

१ जानेवारी २०१८ पासूनचे वेळापत्रक
महालक्ष्मी स. ६.५८ वा., बोरिवली स. ७.५० वा.
चर्चगेट स. ८.५४ वा., विरार दु. १०.१३ वा.
चर्चगेट स. ११.५० वा., विरार दु. १.०५ वा.
चर्चगेट दु. २.५५ वा., विरार दु. सायं.१२ वा.
चर्चगेट सायं. ५.४९ वा., बोरिवली सायं. ६.४१ वा.
चर्चगेट सायं. ७.४९ वा., विरार रात्री. ९.१५ वा.

बोरिवली स. ७.५४ वा., चर्चगेट स. ८.५० वा.
विरार स. १०. २२ वा., चर्चगेट स. ११. ४६ वा.
विरार दु. १. १८ वा., चर्चगेट दु. २. ४४ वा.
विरार सायं. ४.२२ वा., चर्चगेट सायं. ५.४४ वा.
बोरिवली सायं. ६.५४ वा., चर्चगेट सायं. ७.४४ वा.
विरार रात्री. ९.२४ वा., चर्चगेट रात्री. ९.४८ वा.

एसी लोकलचे भाडे 
                                                             तिकिट दर 
स्थानक                          सिंगल   साप्ताहिक  पाक्षिक   मासिक 
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल            ६०        २८५        ४३०        ५७०
चर्चगेट ते दादर                    ८५         ४४५        ६३०        ८२०
चर्चगेट ते बांद्रा                     ८५        ४४५        ६३०        ८२०
चर्चगेट ते अंधेरी                  १२५       ६५५        ९४५       १२४०
चर्चगेट ते बोरिवली              १६५       ८५५       १२४५       १६४०
चर्चगेट ते भाईंदर                 १७५       ९०५       १३२५       १७४५
चर्चगेट ते वसई                   १९५      १०३५      १५०५       १९७५
चर्चगेट ते विरार                  २०५      १०७०       १५५५       २०४०

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom