Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

नववर्षांच्या स्वागतासाठी बेस्टच्या विशेष बसगाड्या


मुंबई । प्रतिनिधी - नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईतील सागर किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०१७ च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर, चौपाटीवर रात्रीच्या वेळी फिरावयास जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी बसमार्ग क्रमांक ७ मर्यादित,१११ ,११२ २०३, २३१, २४७ आणि २९४ वर रात्री १० वाजल्यापासून एकूण २० एकमजली जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी, बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशाना आवाहन करण्यात येते की त्यांनी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने उपलब्ध केलेल्या जादा बसगाड्यांची नोंद घेऊन या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाद्वारे केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom