मेमून मेन्शन आगीत होरपळून ४ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2018

मेमून मेन्शन आगीत होरपळून ४ जणांचा मृत्यू


मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरातील आगीमधील दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अंधेरीच्या मरोळ भागात आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवार आणि गुरुवारच्या दरम्यान रात्री १२.३० च्या सुमारास मेमून मेन्शन या निवासी इमारतीला आग लागली. या आगीत ९ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत.

अंधेरी मरोळ भोरी कॉलनी येथील मेमून मॅन्शन इमारतीमधील कपसी कुटुंबियांच्या घरात रात्री आग लागली हि आग वरील मजल्यावरील कोठारी कुटुंबियांच्या घरात पोहोचली. आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवत आगीत अडकलेल्या जखमींना रुग्णालयात दाखल केले असता सकीना आपासी कपासी (१४), मोहीन अपासी कपासी (१०), तस्लीम अपासी कपासी (४२), दाऊद अली कपासी (८०) यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. तर कपासी कुटुंबाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कोठारी कुटुंबातील इब्राहिम कोठारी (५७), सकीना कोठारी (५३), हुसेन कोठारी (२६), हजीफा कोठारी (२१), झारा कटलरीवाला (४२) हे पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी झारा कटलरीवाला यांच्यावर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. तर इतरांवर होली स्पिरिट रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं या रुग्णालयातल्या डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Post Bottom Ad