अत्याचाराचा निषेध म्हणून आठवले, पासवान यांनी राजीनामे द्यावेत - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

04 January 2018

अत्याचाराचा निषेध म्हणून आठवले, पासवान यांनी राजीनामे द्यावेत


मुंबई । अजेयकुमार जाधव -
भीमा कोरेगांव येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच आंबेडकरी अनुयायांवर भाजपाकडूनच अन्याय अत्याचार होत आहे. यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी आहे. आंबेडकरी अनुयायांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेध म्हणून सरकारमध्ये सहभागी असलेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व रामविलास पासवान यांनी आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे द्यावेत या मागणीला आता जोर धरू लागला आहे.

भीमा कोरेगांव येथे विजय स्तंभाला भेट देण्यास येणाऱ्या भीम सैनिकांवर दगडफेक करण्यात आली. त्यांची वाहने तोडून काही वाहने जाळण्यात आली. आचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. सोमवार पासून बुधवार पर्यंत अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. एसटी, बसेस तोडण्यात येऊन काही ठिकाणी आगी लावण्यात आल्या. रेल रोको करण्यात आले. रास्ता रोको करून वाहतूक बंद करण्यात आली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असताना रामदास आठवले यांनी सरकारपुढे लाचार न होता स्वाभिमानी बाणा दाखवून सत्तेला लाथ मारावी, मंत्रीपदाचा राजीनामा देऊन समाजासोबत यावे अशी चर्चा आंबेडकरी अनुयायांकडून केली जात आहे.

अहमदनगरमध्ये ५ जानेवारी रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या अनुषंगाने आंबेडकरी समाजातील संघटनांची एका बैठक नुकतीच संपन्न झाली. आरपीआय (आठवले)चे प्रदेश सचिव व प्रवक्ता अशोक गायकवाड, माजी नगरसेवक अजय साळवे, अर्शद शेख, बन्सी सातपुते, सुनील क्षेत्रे, संजय खामकर, जयंत गायकवाड, संजय कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थिती होते. या बैठकीदरम्यान अत्याचाराचा निषेध म्हणून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत आठवले यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिली पाहिजे, अशा प्रतिक्रिया काही तरुणांनी बैठकीत व्यक्त केल्या. आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आठवले यांनी आदर केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरपीआय (आठवले गट) प्रवक्ता अशोक गायकवाड यांनी दिली.

संघ परिवार व भाजपाला मानणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या गुंडांनी आंबेडकरी अनुयायांना मारहाण केली आहे. याबाबत आंबेडकरी समाजात संतापाची लाट आहे. या घटनेने मनात आगडोंब उसळला आहे. आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत. असे असताना या घटनेचा निषेध म्हणून सरकारमध्ये आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या रामदास आठवले व रामविलास पासवान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावे अशी मागणी आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

Post Top Ad

test
test