Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबई मॅरेथॉनमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती


मुंबई | प्रतिनिधी - मुंबई मॅरेथॉनमध्ये ऍपेक्स किडनी फाऊंडेशनने अवयवदानाबाबत जनजागृती केली. किडनी प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन अवयवदानाचा संदेश दिला.

देशात अवयवांच्या प्रतिक्षा यादीत लाखोंची संख्या आहे. रुग्णांचे जीव वाचवायचे असतील तर अवयवदानाचं महत्व घरोघरी पोहोचणं महत्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ॲपेक्स किडनी फाउंडेशनने मुंबई मॅरेथॉनमध्ये अवयवदानाचं किती महत्व आहे, याबाबत जनजागृती केली. या मॅरेथॉनमध्ये किडनी प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. ॲपेक्स किडनी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विविध संदेशाचे फलक हातात घेऊन अवयवदानाबाबत जनजागृती केली. अवयवदान कोणीही करू शकतो, मग तो मुलगा आहे का मुलगी हा भेदभाव नाही. अवयवांची प्रतिक्षायादी दिवसेंदिवस वाढतेय, यामुळे भीती वाटतेय. अशा संदर्भाचे डायलॉगचा वापर या मोहिमेत करण्यात आला होता.

मुंबई मॅरेथॉनमध्ये किडनी प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीनी सहभाग घेऊन अनेकांचे लक्ष वेधले. “किडनी प्रत्यारोपण होऊनही आम्ही स्वतला रुग्ण मानत नाही, असा मेसेज दिला. काही मागील चार - ते पाच वर्षांपासून तर किडनी प्रत्यारोपण आधी कधीही न धावणारे प्रत्यारोपणानंतर धावणारे होते. प्रत्यारोपणानंतर धावता येईल का? असा प्रश्न होता मात्र कुटुंब व किडनी फाउंडेशनच्या मदतीने धावता आल्याचे सांगत काहींनी समाधान व्यक्त केले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom