नगरसेवकांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव करण्यासाठी प्रकिया बदला - रईस शेख - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2018

नगरसेवकांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव करण्यासाठी प्रकिया बदला - रईस शेख


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना सभागृहात नगरसेवक अनेक सूचना करतात. मात्र या सूचनांची पालिका प्रशासन दखल घेत नाही. यामुळे नगरसेवकांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव करता यावा म्हणून पालिकेच्या अर्थसंकल्प सादर करणे व मंजूर देण्याच्या प्रक्रियेत बदल करावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते व नगरसेवक रईस शेख यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे शहरातील नागरी विकासांची कामे केली जातात. हि सर्व कामे पार पाडण्याकरिता मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी आयुक्तांमार्फत तरतुदी केल्या जातात. यानंतर वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाज स्थायी समिती मंजूर केल्यावर त्याला मंजुरीसाठी महापालिकेकडे सादर केले जातात. महापालिकेच्या मार्च महिन्याच्या सभांमध्ये अर्थसंकल्पीय अंदाजावर चर्चा करून सदर अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर केले जातात. या सभांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक आपल्या विभागातील कामांबाबत अनेक तरतुदी सुचवतात. मात्र दरवर्षी ३१ मार्च पूर्वी अर्थसंकल्पास मंजुरी देणे आवश्यक असल्याने अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नगरसेवकांच्या जास्तीत जास्त सूचनांचा अंर्तर्भाव करता येत नाही. यामुळे नगरसेवकांच्या त्यांच्या विभागातील नागरिकांच्या गरजेनुसार सुचवलेल्या कामांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव करता यावा म्हणून पालिकेच्या प्रक्रियेत बदल करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अंदाज अंतिम स्वरूपात तयार कारण्यापूर्वी त्यावर चर्चा करण्याची गरज आहे. तरच नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करणे सोपे होणार आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प अधिकाधिक लोकभिमुख आणि वास्तववादी होण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी पालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या सभा आयोजित कराव्यात आणि सदर सभेत नगरसेवकांनी केलेल्या रास्त सूचनांचा अनुषंगाने तरतूद करून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यात यावा अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.

Post Bottom Ad