भाजपाच्या विरोधानंतर करदात्यांच्या पैशांमधून मिळणारे मोबाईल नगरसेवकांनी नाकारले - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 January 2018

भाजपाच्या विरोधानंतर करदात्यांच्या पैशांमधून मिळणारे मोबाईल नगरसेवकांनी नाकारले


नगरसेवकांना मोबाईल बिलचे पैसे देण्यासही भाजपा विरोध करणार -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना हायटेक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून २०१२ पासून मोबाईल आणि लॅपटॉप वाटप केले जात होते. २०१२ मध्ये महापालिकेच्या सर्वच नगरसेवकांनी पॅलिएकडून देण्यात आलेले मोबाईल आणि लॅपटॉप वापरले. २०१७ च्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या राजकारणात झालेल्या उलथापालथी नंतर नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या मोबाईलच्या प्रस्तावाला भाजपाने विरोध केला आहे. करदात्यांच्या पैशातून उधळपट्टी नको असा मुद्दा भाजपाने लावून धरल्याने इतर पक्षीयांनाही पालिकेच्या मोबाईलवर पाणी सोडावे लागले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या २२७ तसेच नामनिर्देशित ५ अश्या एकूण २३२ नगरसेवकांना नागरी कामांसाठी व महानगरपालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून २०१२ ते २०१७ या कालावधीतील नगरसेवकांना महापालिकेद्वारे प्रत्येकी १० हजार ५०० रुपये इतक्या किमतीचा मोबाईल संच, त्याची दुरुस्ती व देखभाल करावी या अटीवर कायमस्वारूपी देण्यात आला होता. याच धर्तीवर २०१७ मध्ये नव्याने निवडणून आलेल्या नगरसेवकांना मोबाईल फोन देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. त्यासाठी ऑप्पो, सॅमसंग, व्हिओ, मोटरोला कंपनीचे मोबाईल घेण्यासाठी यादी प्रस्तावासोबत सादर करण्यात आली होती.

गटनेत्यांच्या बैठकीत मोबाईल खरेदीच्या प्रस्तावावर भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी विरोध दर्शवला. प्रत्येक नगरसेवकाकडे दोन मोबाईल आहेत. नागरिकांच्या करामधून जमलेल्या पैशांमधून नगरसेवकांना २५ हजार रुपये मानधन दिले जाते. मग नागरिकांच्या पैशामधून आणखी सुविधा कशाला हव्यात असा प्रश्न कोटक यांनी उपस्थित केला. यावर सर्व पक्षीय गटनेत्यांनी भाजपाच्या भूमिकेचे समर्थन करत नागरिकांच्या पैशातून मिळणारे मोबाईल नको असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नगरसेवकांना लॅपटॉप किंवा टॅब देण्यात येणार आहेत. या प्रस्तावालाही गटनेते विरोध करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाईलचे बिलही घेणार नाही -
आजच्या गटनेत्यांच्या बैठकीत नगरसेवकांना मोबाईल देण्याचा प्रस्ताव आला. नागरिकांच्या कारमधून जमलेल्या पैशांमधून नगरसेवकांना दरमहा २५ हजार रुपये इतके मानधन मिळत आहे. प्रत्येक नगरसेवकाकडे दोन मोबाईल आहेत, २५ हजार रुपये मानधन मिळत असताना नागरिकांच्या पैशांमधून आणखी मोबाईलवर उधळपट्टी कशाला असा मुद्दा उपस्थित करून मोबाईल घेण्यास विरोध केला. याला सर्व पक्षीय गटनेत्यांनी पाठींबा देत पालिकेकडून मिळणारे मोबाईल नाकारले आहेत. नगरसेवकांना ११०० रुपये व समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांना ३ हजार रुपये मोबाईलचे बिल देण्याचा प्रस्ताव येणार आहे. या प्रस्तावालाही भाजपा कडाडून विरोध करेल. नगरसेवकाला २५ हजार रुपये मानधन मिळते त्यामधून त्यांनी हा खर्च भागवावा. 
- मनोज कोटक, गटनेते, भाजपा

Post Top Ad

test
test