आयुक्तांवर दबाव टाकणाऱ्यांची नावे उघड व्हावी म्हणून याचिका - नितेश राणे - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

09 January 2018

आयुक्तांवर दबाव टाकणाऱ्यांची नावे उघड व्हावी म्हणून याचिका - नितेश राणे


हुक्काबार विरोधात सह्यांची मोहीम -
मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल आगीच्या दुर्घटनेनंतर बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करताना माझ्यावर राजकीय दबाव आणल्याचे वक्तव्य पालिका आयुक्तांनी केले आहे. आयुक्तांवर दबाव टाकणाऱ्यांची नावे उघड व्हावी म्हणून न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका दाखल केल्याची माहिती कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दुर्घटनेस जबाबदार विशाल कारयावर कठोर कारवाई तसेच बाबा खोडपे नावाच्या व्यक्तीला अटक करावी, अशी मागणी राणे यांनी केली.

कमला मिल कंपाऊंडमधील पबला आग लागून १४ जण मृत झाले. दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली गेली. मात्र, दहा दिवस उलटून गेल्यानंतर अद्याप एकावरही कारवाई झालेली नाही. मंगळवारी विशाल कारया नावाच्या व्यक्तिला पोलीसांनी ताब्यात घेतले. हा मॅच फिक्सर असून त्याचे अनेक क्रिकेटर, आय.ए.एस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. शिवाय, त्याच्या घराबाहेर कमला मिल हॉटेल मालकांच्या गाड्या मिळाल्या आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला. यावेळी त्याच्या भ्रमणध्वनीवरुन केलेल्या संभाषणाची माहिती, आग दुर्घटनेनंतर त्यांनी ज्या व्यक्तीच्या भेटीगाठी घेतल्या त्याची माहिती व त्याची प्रॉपर्टी सील करुन सीबीआयमार्फत त्याची चौकशी करावी तर वरळी परिसरात अनधिकृत बांधकामासाठी तात्काळ परवाने मिळवून देणाऱ्या बाबा खोपडे नावाच्या व्यक्तीला अटक करावी, अशी मागणी राणे यांनी केली.

दुर्घटनेनंतर आयुक्तांनी हॉटेलमधील अनधिकृत व नियमबाह्ये बांधकामे तोडण्यास सुरुवात केली. ही कारवाई करताना, माझ्यावर दबाव असल्याचा गौप्यस्फोट त्यांन केला. त्यामुळे दबाव टाकणाऱ्यांची नावे त्यांनी उघड करावी, याकरिता न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचे राणेंनी सांगितले. तसेच आगीबाबत सीडीआर अहवाल तयार केला असून हे प्रकरण विधीमंडळ आणि न्यायालयात उचलून धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान हुक्काबार मुळे कमला मिलमध्ये आग लागली. मुंबईतील हुक्काबार बंद करण्यासाठी कॉंग्रेसने हुक्काबार मुक्त मुंबई नावाची संकल्पना सुरु केली आहे. यासाठी मुंबईत ठिकठिकाणी सह्यांची मोहिम राबवली जात असल्याचे राणे यांनी सांगितले.

Post Top Ad

test
test