घाटकोपर रमाबाई नगरात सहा तास रास्ता रोको - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

03 January 2018

घाटकोपर रमाबाई नगरात सहा तास रास्ता रोको


बंद दरम्यान भीम सैनिकांनी माणुसकी जपली -
मुंबई । अजेयकुमार जाधव -
भीमा कोरेगांव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भीम सैनिकांवर सणसवाडी येथे दगडफेक करून त्यांच्या गाड्य जाळण्यात आल्या. याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी मंगळवार नंतर आज बुधवारीही सहा तासाहून अधिक काळ पूर्व द्रुतगती महामार्ग रोखून धरण्यात आला.

भीमा कोरेगांव येथील घटनेचे मुंबईसह महाराष्ट्रात पडसाद उमटले. मंगळवारी सकाळी घाटकोपरच्या रमाबाई नगर जवळील पूर्व द्रुतगती मार्ग रोखून धरण्यात आला. सायंकाळी ७ नंतर हा मार्ग खुला करण्यात आला. मंगळवारी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी बंद पाळणार असल्याचे जाहीर केले. यामुळे बुधवारी सकाळपासून रमाबाई आंबेडकर नगरमधील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीम सैनिक मोठ्या संख्येने जाम झाले होते. पोलीस या भीम सैनिकाना काही काळासाठी परत पाठवत असले तरी पुन्हा काही वेळाने भीम सैनिक पुन्हा जमा होत होते.

पोलिस समजावण्याच्या प्रयत्न करत असतानाच सकाळी ११ च्या सुमारास तरुणाचा जमाव पूर्व डर्ट गती मार्गावर पोलिसांचे कडे तोडून घुसला आणि रास्ता रोको केला. बघता बघता शेकडो तरुण रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. हायवेवरील दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. जय भीम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करा इतयादी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. याच दरम्यान जमावाने जाऊन घाटकोपर डेपो येथील वाहतूकही दुपारी १२.३० वाजता रोखली. सायंकाळी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची घोषणा केल्यावर सायकळै ५ वाजता बंद मागे घेण्यात आला.

बंद दरम्यान भीम सैनिकांनी माणुसकी जपली -
महाराष्ट्र बंद अनेक ठिकाणी बंदला गालबोट लागले असताना रामबाई आंबेडकर नगरमधील भीम अनुयायांनी माणुसकी जपल्याचे चित्र बंद दरम्यान दिसून येत होते. तब्बल सहा तास रास्ता रोको केला असताना या वेळात येणाऱ्या ऍम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या, पोलिसांच्या गाडयांना वाट मोकळी ठेवण्यात आली होती. एका रिक्षामधून एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना आंदोलनकर्त्यांनी या रिक्षाला अटकाव न करता वाट मोकळी करून दिली. एका विद्यार्थ्याला परीक्षेला जायचे होते. त्याने हॉल तिकीट दाखवताच आंदोलनकर्त्यांनी त्याची दुचाकी न अडवता त्यालाही परीक्षेला जाण्यासाठी अटाकाव केला नाही.

Post Top Ad

test
test