अग्निसुरक्षेबाबत ६२० आस्थापनांना सुधारणा करण्याचे आदेश


मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपहारगृहांच्या तपासणी मोहिमेदरम्यान ९९४ उपहारगृहांची, आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान साधारणपणे गेल्या आठवड्याभरात ६२० आस्थापनांना, उपहारगृहांना तपासणी अहवाल (Inspection Report) देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक तपासणी अहवाल हे 'के पूर्व' परिसरात ६९ आस्थापनांना देण्यात आले आहेत. तर ४५ आस्थापनांमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले असून यामध्ये'जी दक्षिण' विभागात सर्वाधिक म्हणजेच २१ ठिकाणी तोडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 'बी' विभागातील 'जस्ट फॉर यु पार्लर' ही आस्थापना सील करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अनधिकृतपणे साठा केलेले २०८ गॅस सिलिंडर्स देखील या तपासणी मोहीमेदरम्यान जप्त करण्यात आले आहेत.
Tags