Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिकेच्या उर्दू शाळेत घुसखोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार


मुंबई । प्रतिनिधी -
वांद्रे पश्चिमेला असलेल्या अंजूमन इस्लामच्या मदिना बिल्डींगमधील पालिकेच्या उर्दू शाळेतील वर्गखोल्यांमध्ये चार भाडेकरुंनी ९ वर्षांपासून घुसखोरी केली असून ह्या घुसखोरांना हुसकावून लावून सदर वर्ग खोल्या पालिकेने ताब्यात घाव्यात अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आज शिक्षण समिती सभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. यावर शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी अशा बेकायदेशीररीत्या पालिकेच्या वर्गखोल्यात भाडेकरू घुसविणाऱ्या ट्रस्टवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले.

वांद्रे पश्चिमेला असलेल्या अंजूमन इस्लामच्या मदिना बिल्डींगमधील पालिकेच्या उर्दू शाळेतील वर्गखोल्यांमध्ये चार भाडेकरूंनी गेल्या नऊ वर्षांपासून घुसखोरी केले असल्याचे आज शिक्षण समिती सभेत शीतल म्हात्रे यांनी उघडकीस आणले . त्यांना तेथून हुसकावण्यासंबंधी पालिकेच्या एच पश्चिम विभागाने इमारतीच्या मालकांशी पत्रव्यवहार करुनही ते दाद देत नाहीत आणि यामुळे हे प्रकरण वांद्रे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांपर्यंत पोहचलेअसल्याचे सांगत मात्र पोलिसांकडूनही कारवाई होत नसल्याचे सांगितले. उलट पोलिसांकडून पालिकेने न्यायालयात जावे असा अजब सल्ला देण्यात आला आहे. यावेळी भाजपच्या सदस्य विनोद मिश्रा यांनी पालिकेच्या वर्गखोल्यांमध्ये परस्पर भाडेकरू घुसविणे हे बेकायदेशीर असून या प्रकरणी सदर संस्थेविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात यावी असे सांगितले. शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी सदर संस्थेविरोधात तक्रार करून घेण्यास नकार दिल्यास आपण स्वतः उपयुक्त [ शिक्षण ] मिलिंद सावंत यांच्यासह संबंधित साहय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल करून घेऊ तसेच या जागेचा पुनर्विकास झाल्यास कायद्यानुसार पालिकेची जागा देणे बंधनकारक असल्याचे सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom