जयकुमार रावल यांची नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीची तक्रार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

30 January 2018

जयकुमार रावल यांची नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीची तक्रार


दोंडाईचा - धुळे जिल्हयातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करून विविध वृत्तवाहिणीवर पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात बदनामीकारक बेताल वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अंगाशी आले आहे. विखरण येथे जयकुमार रावल यांनी घेतलेली जमिन ही अधिसूचना निघाल्याच्या 2 महिनेआधीच खरेदीचा व्यवहार झाला असून त्यासाठी महाजनको सह जिल्हाधिकारी, धुळे यांनी त्यांना रितसर परवानगी दिली असल्याचे कागदपत्र पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज पत्रकारांसमोर सादर करून त्याच दस्ताऐवजांच्या आधारे रावल यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात दोंडाईचा पोलिसात तक्रार देवून दोडाईचा न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

धुळे जिल्यातील विखरण येथील वीज प्रकल्पासाठी 2009ला शेतकरीची जमीन भूसंपादन अधिकाऱ्यानी अधिग्रहित केली आहे.त्यात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा कमी मोबदलामिळाल्याचा कारणावरून धर्मा पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .त्यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. धर्मा पाटील यांचा मृत्यूचे राजकीय भांडवल नवाब मलिक यांनी करून रोजगार हमीयोजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा विरोधात विविध प्रसारमाध्यमांमध्ये बेताल वक्तव्ये केली होती, जमीन बळकविल्याचा व धर्मा पाटील यांचा मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा कोणतीहीशहनिशा न करता व खोटे नाटे आरोप करून ना जयकुमार रावल यांचा राजकीय व सामाजिक प्रतिष्टेला धक्का पोहचवला. राजकीय बदनांमी केली. यामुळे आज दोडाईचा पोलिसात ना जयकुमाररावल यांनी नबाब मालिक यांचा विरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केली आहे. दोडाईचा न्यायालयात ही नवाब मालिक यांचा विरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केल्याने मलिकयांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. पो नि हेमंत पाटील यांनी भादंवि कलम 499 व 500 नुसार मानहानीचा तक्रार दाखल केली असून पुढील तपास उपनीरीक्षक निलेश मोरे करीत आहेत.

दरम्यान, तक्रार दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना रावल यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनाच आरोपींच्या पिंज-यात उभे करत समाजसेवक अण्णा हजारे यांनी मलिक यांचेभ्रष्ट्राचाराचे प्रकरण बाहेर काढले होते त्यावेळी मलिक यांना राजीनामा दयावा लागला असल्याचे नमुद करत रावल परीवार हा दानशूर परीवार असून लोकांच्या जमिनी घेण्याचे सांगणा-या नवाबमलिकांना रावल परीवाराचा इतिहास माहित नाही, रावल परीवाराकडे स्वातंत्रपूर्व काळात 5000 एकर जमिन होती, त्यातून बाजार समिती, दुध संघ, खरेदी विक्री संघ, टेलिफोन कार्यालय, सार्वजनिकबांधकाम विभागाचे कार्यालय, बस स्टॅन्ड अशा विविध सार्वजनिक ठिकाणी जमिनी नाममात्र दरात दिलेल्या आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांची रावल परीवारावर टीका करण्याची लायकी नाही,दोंडाईचा येथील कत्तलखान्याला आम्ही विरोध केल्यामुळे नवाब मलिक यांचा जळफळाट झाल्याचे जयकुमार रावल यांनी यावेळी नमुद केले.

Post Top Ad

test
test