Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कमला मिल आगप्रकरणी वन अबव्हच्या दोन व्यवस्थापकांना अटक

मुंबई - कमला मिल आगप्रकरणी वन अबव्हच्या दोन व्यवस्थापकांना रविवारी रात्री एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज अशी अटक व्यवस्थापकांची नावे आहेत. आज न्यायालयाने दोघांनाही ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कमला मील आगप्रकरणी वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर या तिघांसह व्यवस्थापकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तिघेही संचालक पसार झाले. त्यांना पसार होण्यास मदत केली म्हणून संघवीच्या तीन काकांविरुद्ध भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात राकेश, आदित्य यांना शनिवारी अटक केली तर महेंद्रला रविवारी केली. तिघांचीही जामिनावर सुटका झाली आहे. सोमवारी केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज या दोघांनाही भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. अ‍ॅड. विजय ठाकूर यांनी व्यवस्थापकांच्या बाजूने युक्तिवाद केला. ही आग वन अबव्हमुळे नव्हे तर मोजोसमुळे लागल्याचा दावा त्यांनी केला. ती आग मोजोसमधून वन अबव्हकडे आली. तेथे अग्निरोधक यंत्रणांचा अभाव असल्याने त्यांच्या ग्राहकांनी वन अबव्हच्या दिशेने धाव घेतली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा गुन्हा नसून हा अपघात आहे. शिवाय आमच्या कर्मचाºयांनीच त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आमच्याही एका कर्मचाºयाचा यात मृत्यू झाला. यामध्ये व्यवस्थापकांचा सहभाग नाही. ते फक्त तेथील कर्मचारी आहेत. यामागील मुख्य सूत्रधार मालक आहे. त्यांना पकडण्यात तपास यंत्रणेला यश आलेले नाही. त्यामुळे तपास यंत्रणेने त्यांना पकडणे गरजेचे असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. न्यायालयाने दोघांनाही ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom