मध्य रेल्वेच्या हक्काची बम्बार्डिअर लोकल कुर्ल्याच्या कारशेडमध्ये दाखल - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 February 2018

मध्य रेल्वेच्या हक्काची बम्बार्डिअर लोकल कुर्ल्याच्या कारशेडमध्ये दाखल


मुंबई । प्रतिनिधी -
मध्य रेल्वेच्या हक्काची बम्बार्डिअर लोकल कुर्ल्याच्या कारशेडमध्ये दाखल झाली. ही नवी बम्बार्डिअर पुढच्या ८ ते १൦ दिवसांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे. चेन्नई येथे बनवण्यात आलेली लोकल कुर्ल्याच्या कारशेडमध्ये दाखल झाली आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेवर ४ बम्बार्डिअर लोकल धावत आहेत. त्या पश्चिम रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. या लोकलच्या आगमनाने मध्य रेल्वेला आपल्या हक्काची लोकल मिळालेली आहे. या लोकलमध्ये महिलांसाठीच्या डब्यात वाढ करण्यात आली आहे. महिलांना या लोकलमध्ये ३ ऐवजी ५ राखीव डबे आहेत. महिलांच्या प्रत्येक डब्यात ६ ते ८ सीसीटीव्ही, सर्व डब्यांमध्ये एलईडी लाइट्स, कार्बोनेट सीट्सऐवजी स्टेनलेस स्टील सीट्स, सर्व पंख्यांना स्टेनलेस स्टीलची जाळी व मोटरमनच्या केबिनमध्ये एसी लावण्यात आली आहे. येत्या काळात मध्य रेल्वेच्या हक्काच्या आणखी काही बम्बार्डिअर्स लोकल ताफ्यात दाखल होणार आहेत.

Post Bottom Ad