Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

हँकॉक पुलाचे दोनवेळा होणार उदघाटन


शिवसेना, पालिकेच्या उदघाटन कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार -
मुंबई । प्रतिनिधी -
मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील हँकॉक पुलाचे उदघाटन आज महापालिकेच्यावतीने महापौरांच्या हस्ते करण्यात आले. हा उदघाटन कार्यक्रम श्रेयासाठी केला असल्याचा आरोप करता कार्यक्रमावर काँग्रेस सह सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. सत्ताधारी शिवसेना आणि पालिकेच्यावतीने केलेल्या उदघाटनानंतर काँग्रेसने मंगळवारी उदघाटन करणार असल्याचे जाहिर केले आहे. यामुळे हँकॉक पूलाचे दोनवेळा उदघाटन होणार आहे.

हँकॉक पुल धोकादायक झाल्याने दोन वर्षापूर्वी पाडण्यात आला होता. पुलाच्या गैरसोयींमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत न्यायालयानेही पालिकेला खडसावले होते. रेल्वेने व महापालिकेने पुल पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था केली नव्हती. तसेच पाडलेला पुल पुन्हा केव्हा बांधणार याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली. यावर न्यायालयाने पालिका व मध्य रेल्वेला फैलावर घेतले. त्यानंतर महापालिकेने पुलाच्या उभारणीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्यास ४ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. यामध्ये मेसर्स साई प्रोजेक्ट्स प्रा. लि. ने सर्वात कमी खर्चात पुल उभारण्यासाठी निविदा भरली होती. मेसर्स साई प्रोजेक्ट्स प्रा. लि. ला ५१ कोटी ७० लाख १२ हजार ९२९ रुपये इतका खर्च करून पुल उभारण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे दोन वर्षानंतर या पुलाच्य़ा भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. पुलाचे बांधकाम आता सुरू होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिऴाला आहे. मात्र या पुलावरून सत्ताधारी विरोधकांचे श्रेयवाद सुरु झाला आहे. सोमवारी प्रशासन व सत्ताधा-यांनी भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पाडला असताना या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. या पुलाचे बांधकाम आमच्यामुळेच मार्गी लागले, असा श्रेयवाद सत्ताधारी - विरोधकांकडून सुरु झाला आहे. य़ा परिसरात पुलाच्या श्रेयाचे सत्ताधारी, विरोधकांचे बॅनर्सही झळकले आहेत. सोमवारी सत्ताधारी शिवसेनेने अधिकृतपणे भूमीपूजनाचा कार्यक्रम केला असताना दुस-याचे दिवशी काँग्रेसने भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आगामी 2019 ला होणा-या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठीच हा श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा या परिसरात सुरू होती.

असे होणार बांधकाम --
पुलाची लांबी ६४.६२ मीटर, रुंदी ३०.०८ मीटर असून पुलाचे पृष्ठीकरण डीबीएम आणि मास्टिक अस्फाल्टचे असणार आहे. आर.सी.सी.वॉल टाईप पाईल्स पद्धतीचे या पुलाच्या पायाचे बांधकाम असणार आहे. तसेच स्टील गर्डर व आर.सी.सी. डेक स्लॅब अशा प्रकारचे बांधकाम केले जाणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom