फॅशन स्ट्रीटवरील स्टॅालधारकांना पालिकेचा दणका - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

09 April 2018

फॅशन स्ट्रीटवरील स्टॅालधारकांना पालिकेचा दणका


अतिक्रमण न हटवल्यास परवाना रद्द करणार -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत सर्व प्रकारच्या फॅशनचे कपडे व वस्तू मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणजे फॅशन स्ट्रीट. या फॅशन स्ट्रीटवर असलेल्या स्टॉल धारकांनी पालिकेने नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त फुटपाथवरही अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण करणाऱ्या 396 स्टॉल धारकांना महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. नियमानुसार नेमून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा अन्यथा स्टॉलधारकांचा परवाना रद्द करू असा इशारा देण्यात आल्याची माहिती 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

फँशन स्ट्रीटवरील दुकानांवर पालिकेने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त स्टॉलसमोरील फूटपाथवरची जागाही येथील दुकानदारांनी व्यापल्या आहेत. असे व्यवसाय थाटणा-या सर्व ३९६ स्टॉलधारकांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. अतिक्रमण काढण्याबाबत पालिकेने सातत्याने सूचना देवूनही नियम धाब्यावर बसवून लोखंडी पाईप, लाकडी बांबू आणि ताडपत्रीच्या सहाय्याने अनधिकृतपणे अतिरिक्त जागा व्यापल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. यामुळे फूटपाथ अडवला जावून लोकांना चालताना त्रास होत असल्याच्या असंख्य तक्रारीही पालिकेच्या 'ए' विभागाकडे आल्या होत्या. मागील वर्षीही 50 स्टॉलना नोटीसा काढल्या होत्या. त्यापैकी 30 जणांचे लायसन्सही रद्द करण्यात आले होते. परंतु उच्च न्य़ायालयाने यावर स्थगिती दिली आहे. मात्र याचा गैरफायदा घेवून पुन्हा अनधिकृतपणे स्टॉलमधील माल ठेऊन फूटपाथ अडवला जात आहे. 48 तासांत अतिक्रमण न हटवल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. ही मुदत आता संपली आहे. संधी देऊनही संबंधित दुकानदारांनी सुधारणा न केल्यास परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले आहे.

Post Top Ad

test