Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कुर्ल्यातील पाण्याची गळती थांबवण्यासाठी ५ कोटींचा खर्च


मुंबई | प्रतिनिधी - मुंबईत पाण्याची गळती आणि पाणी दूषित येणे हि मोठी समस्या आहे. अशीच समस्या कुर्ला येथील एल वार्डमध्ये आहे. कुर्ल्यातील पाणी गळती व पाण्याचे दूषितीकरण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध कामे हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या गंजलेल्या जलवाहिन्य़ा काढून नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या कामासाठी पालिका ५ कोटी ६० लाख रुपयाचा खर्च करणार आहे.

गळती थांबवण्याच्यादृष्टीने सुरु असलेली कामांचे कंत्राट संपल्याने आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली जाणार आहे. विभागात पाण्याचे दूषितीकरण रोखण्यासाठी 300 मिमी पर्यंत विविध व्यासाच्या १०० मीटर लांबी पर्यंतच्या जुन्या गंजलेल्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्य़ा टाकल्या जाणार आहेत. तसेत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुऴे अथवा पर्जन्य जलवाहिन्यांमधून जाणा-या जलवाहिन्य़ांचे स्थलांतरीत केले जाणार आहे. पाणी पुरवठ्यात सुधारणा केत्या जाणार असून त्यासाठी छेद जोडण्या करणे, झडपा बसवणे, झडपांचे चेंबर्स बांधणे व दुरुस्ती करणे, अत्यावश्यक असलेले नळखांब बसवणे, दुरुस्ती करणे आदी कामे केली जाणार आहेत. भविष्यात उद्भवणारी पाण्याची गळती व दूषितीकरण दूर करण्याच्या दृष्टीने हे काम हाती घेतले जाणार आहे. या अंतर्गत कराव्या लागणा-या कामाचे मोजमाप तसेच अंदाजित खर्च हे मागील चार वर्षामधील झालेल्या कामाचा आढावा घेऊन तयार करण्यात आला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मे. रश्मिन कन्स्ट्रक्शन कंपनी या कंत्राटदाराला हे कंत्राट दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom