प्लास्टिक बंदीसाठी पालिका तपासणी पथकाची नियुक्ती करणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

01 April 2018

प्लास्टिक बंदीसाठी पालिका तपासणी पथकाची नियुक्ती करणार


मुंबई । प्रतिनिधी - राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी महापालिका विभागनिहाय तपासणी पथक नियुक्ती करणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकर अमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर त्याच्या अमलबजावणीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. तपासणी व दंड वसुली साठी विभागवार कर्मचारी, अधिकाऱयांचे तपासणी पथक नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हे पथक विभागवार असणार आहे. यादृष्टीने कर्मचा-यांची निवड करणे, त्यांची कर्तव्यसूची तयार करणे इत्यादी बाबतची कार्यवाही करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केली जात असताना, कुणाला वेठीस धरले जाणार नाही किंवा काही गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी पालिकेकडून घेतली जाणार आहे. क्लिनअप मार्शल सुरू झाले तेव्हा चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेतला गेला. तशा तक्रारीही पालिकेकडे नोंद झाल्या. तसे होणार नाही याची दक्षता पालिकेने घेतली आहे. यादृष्टीने ज्या कर्मचा-यांना प्लास्टिक बंदीच्या तपासणीचे काम सोपविले जाईल, त्यांनी स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने आपल्या पोशाखावर 'नेम-प्लेट' लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कारवाई दरम्यान तसेच कामावर असताना प्रत्येक वेळी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असणार आहे. हे कर्मचारी, अधिकारी ज्या भागामध्ये तपासणी करणार असतील, त्याबाबतची माहिती त्यांनी आपल्या वरिष्ठांना आगाऊ स्वरुपात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पालिकेने सुरू केले आहे. तपासणी पथक नियुक्ती झाल्यानंतर त्यांची यादी विभागवार तयार केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच पालिका याबाबतच्या अमलबजावणीला सुरुवात करणार आहे.

Post Top Ad

test