तीस लाख झाडांच्या गणनेसाठी २ कोटी ८६ लाखांचा खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 April 2018

तीस लाख झाडांच्या गणनेसाठी २ कोटी ८६ लाखांचा खर्च


मुंबई - मुंबईमधील झाडांची गणना करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला ३० लाख झाडांची गणना करण्यासाठी पालिकेने तब्बल २ कोटी ८६ लक्ष रुपये खर्च केले आहेत. कंत्राटदाराने तीनवेळा वाढीव कालावधी मागितल्यानंतर झाडांची गणना पूर्ण झाली आहे.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बीएआरसी, व तिवरांचे क्षेत्र वगळून इतर विभागातील झाडांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. जीआयएस व जपीएस तंत्रज्ञानावर आधार २१ लाख झाडांचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट मे. सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि. ला फेब्रुवारी २०१४ मध्ये देण्यात आले होते. प्रति झाड ९ रुपये ९० पैसे दराने २१ लाख झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी कंत्राटदाराला १५ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. दिलेल्या कालावधीत वृक्ष गणना पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराला सहा महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात आला. या वाढीव कालावधीत ऑगस्ट २०१५ पर्यंत १८ विभागात २१ लाख वृक्षांची गणना करण्यात आली होती. त्यानंतरही एच पूर्व, एच पश्चिम, टी, आर दक्षिण, आर मध्य, व आर उत्तर या सहा विभागातील अंदाजे ६ लाख झाडे मोजण्याचे काम मे २०१६ मध्ये प्रति झाड ९ रुपये या दराने कंत्राटदाराल देण्यात आले होते. ६ विभागातील ६ लाख वृक्षांची गणना करण्यासाठी ५४ लाख रुपायांचे वाढीव कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतरही संरक्षण खात्याचा भूभाग, व्हीआयपी भूभाग व सरकारी कार्यालयांच्या भूभागावरील झाडांची गणना बाकी राहिली होती. मुंबईमधील सर्व झाडांची गणना करून एकत्रित अहवाल पालिकेला सादर करावयाचा असल्याने उर्वरित २ लाख ७५ हजार वृक्ष गणना करण्याचे काम पुन्हा वाढीव कालावधी देऊन कंत्राटदाराला देण्यात आला होता. त्यासाठी २४ लाख रुपये ८५ हजार रुपयांचे कंत्राट तिसऱ्यांदा वाढवून दिले होते. कंत्राटदाराने तब्बल २९ लाख ७५ हजार झाडांची गणना केली असून त्यासाठी पालिकेने २ लाख ८६ हजार ६५ हजार रुपये इतका खर्च केला आहे.

मूळ करार -  २१ लाख झाडे - २ कोटी ७ लाख ९० हजार रुपये
प्रथम वाढ -     ६ लाख झाडे - ५४ लाख रुपये
द्वितीय व अंतिम वाढ - २ लाख ७५ हजार झाडे - २४ लाख ७५ हजार रुपये
एकूण - २९ लाख ७५ हजार झाडे - २ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये

Post Bottom Ad