जकात नाक्यांवर सुसज्ज रुग्णालय उभारा - समृद्धी काते - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

21 June 2018

जकात नाक्यांवर सुसज्ज रुग्णालय उभारा - समृद्धी काते


मुंबई - मुंबईतील बंद पडलेल्या जकात नाक्यांवर अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय सुरू करावे अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. या ठरावाला येत्या पालिका सभागृहात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 

पूर्व व पश्चिम उपनगरात भरधाव वेगावर जाणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे महामार्गावर नेहमी अपघात घडतात. महामार्गावर अपघात घडल्यास दूरवर असलेल्या रुग्णालयात नेईपर्यंत जखमीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यामुळे मुंबईतील जकात नाके ओस पडले आहेत. त्यामुळे मुंबईच्या हद्दीत प्रवेश करताना वाशी ,मुलुंड,दहिसर याठिकाणच्या जकात नाक्यांवर तज्ञ डॉक्टरांच्या पथकासह अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज रुग्णालय सुरू करावे , अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. या ठरावाला सभागृहाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर याबाबतची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, ही सुविधा उपलब्ध झाल्यास अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आजूबाजूच्या लोकांनाही वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणार आहे.

Post Top Ad

test