मेट्रोजवळील पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

26 June 2018

मेट्रोजवळील पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण


मुबंई - मेट्रो येथील पाईप लाईन सोमवारी फुटली होती. पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी झाली तसेच रस्ताही खचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. याची दखल घेत जल अभियंता विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पहाटे दुरुस्ती पूर्ण केली अशी माहिती जल अभियंता विभागाने दिली आहे.

काळबादेवी येथील मेट्रो जंक्शन येथे गोल मस्जिदजवळून पालिकेच्या सी वार्डच्या हद्दीतील रस्त्याखालून ए विभागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जाते. सोमवारी सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी ६०० मि. मी.ची पाईपलाईन फुटली. महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याने या संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा खंडीत न करता तसेच पाणीपुरवठयाच्‍या वेळेत कुठलाही बदल न करता चोवीस तासांत २३१ मी.मी. पाऊस पडला असतानाही भर पावसात विक्रमी वेळेत हे काम रातोरात पूर्ण केले. जल अभियंता विभागाने तातडीने २० फुट लांबीची व ६०० मिमी व्‍यासाची जलवाहिनी भर पावसात नव्‍याने टाकून तत्‍काळ जलवाहिन्‍याच्‍या दोन्‍ही बाजूने झडपा बंद केल्‍याने अपव्यय होणारे पाणी वाचवण्यात पालिकेला यश आले आहे. जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता (परिरक्षण) जलकामे शहर सुशि‍ल चव्‍हाण व दुय्यम अभियंता (परिरक्षण) जलकामे शहर शैलेंद्र सोनटक्‍के यांनी व जलअभियंता खात्‍यातील कर्मचाऱयांनी हे काम पूर्ण केले आहे. जलवाहिनी दुरुस्त केल्यावर दुपारी रस्त्याचे काम करून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

Post Top Ad

test