Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईमध्ये लेप्टोमुळे तिघांचा तर डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू

मुंबई - मुंबईमध्ये लेप्टोने ३ जणांचा तर एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. डेंग्युचा बळी गेलेला रुग्ण हा उत्तरप्रदेशमधून आलेला होता, असे पालिकेच्या आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईमध्ये जून अखेरीपर्यंत लेप्टोच्या एकूण पाच रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी जूनपर्यंत या आजाराचे एकूण २० रुग्ण आढळले होते. मात्र एकाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र यावर्षी एका आठवड्यात तीनजणांना लेप्टोमुळे जीव गमावावा लागला आहे. २६ जूनला कुर्ला येथील पंधरा वर्षीय मुलाचा तर गोवंडी येथील इम्तियाज अली यांचाही लेप्टोमुळे मृत्यू झाला. तर मालाड येथील एकवीस वर्षीय तरुणीला लेप्टोमुळे प्राण गमवावे लागले आहेत. १ ते ३० जून पर्यंत डेंग्यु तसेच डेंग्युसदृश्य आजारांचे एकूण २९७ रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहे. यात २१ डेंग्युच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गॅस्ट्रोचे ७७९ आणि मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये गॅस्ट्रोचे ८८६ आणि मलेरियाचे ४४२ रुग्ण आढळले होते. तर काविळ झालेल्या रुग्णांची संख्या ९४ वर पोहोचली होती. मागील वर्षी कावीळचे ९८ रुग्ण आढळले होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom