पोयसरला इमारत कलली

मुंबई 8/7/2018 - मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे पश्चिम उपनगरातील बोईसर येथे एक ईमारात कलली आहे. पोईसर डेपो पुनीत नगर येथे ही इमारत आहे. तळ अधिक चार मजली या इमारतीचे बांधकाम आहे. इमारतीमध्ये दोन विंग असून प्रत्येक विंगमध्ये २० रूम आहेत. इमारत कलल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. पोलीस आणि अग्निशमन दलाने इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून इमारत रिकामी केली आहे. पालिकेच्या स्ट्रक्चरल कंसल्टंटना घटनास्थळी बोलवण्यात आले असून इमारतीचे परिक्षण केले जात आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर इमारतीमधील रहिवाशांना राहायला द्यायचे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
Tags