बोरिवलीत लोकल पकडताना महिलेचा मृत्यू

मुंबई - पश्चिम रेल्वेवर लोकल पकडताना अलका पाठारे या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. विरार चर्चेगट लोकल बोरिवली स्थानकात आल्यानंतर त्या गाडी पकडण्याच्या प्रयत्नात होत्या. लोकल पकडली पण हात सुटल्याने त्या लोकलखाली गेल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

बोरिवलीच्या नॅन्सी कॉलनीत राहणाऱ्या अलका या वांद्रे-कुर्ला संकुलातील एका राष्ट्रीयकृत बँकेत गेल्या १५ वर्षांपासून कामाला होत्या. त्या कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. बोरिवली स्थानकात आल्या. परंतू सकाळी काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. त्यातच फलाट क्रमांक ३ वर पावणेदहाची चर्चगेट लोकल प्रवाशांनी भरून आली. ही चर्चगेट जलद लोकल पकडण्यासाठी पाठारे सरसावल्या. पण गर्दीमुळे लोकलच्या डब्ब्यात चढण्याच्या प्रयत्नात असताना हात सुटल्याने त्या लोकल आणि फलाटामध्ये असलेल्या गॅपमधुन खाली पडल्या. त्यांना जखमी अवस्थेत शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अलका यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. 
Tags