वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाई

नागपूर - वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाई - वनमंत्री
वन विभागाच्या मागण्यांवर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले,राज्यात वन्य जीवांच्या हल्ल्यांमध्ये बळी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना पूर्वी आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जात असे. त्यात आता दोन लाख रुपयांनी वाढ करुन ही भरपाई दहा लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामध्ये रोख तीन लाख रुपये तर सात लाख रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वन्य जीवांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या नुकसान भरपाईत देखील वाढ करण्यात आली असून 25हजारांवरुन ही रक्कम आता 40 हजार एवढी करण्यात आली आहे.