पंतप्रधान कार्यालयाकडे १२७८७ आरटीआय अर्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2018

पंतप्रधान कार्यालयाकडे १२७८७ आरटीआय अर्ज

नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयाला २०१६-१७ साली तब्बल १२७८७ आरटीआय अर्ज प्राप्त झाले आहेत. २०१२ नंतरचा हा सर्वोच्च आकडा आहे. नागरिक आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी आता माहिती जाणून घेण्यासाठी थेट पीएमओकडे धाव घेणे पसंत केल्याची बाब वरील आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे. अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडे २०१५-१६ मध्ये १११३८ आरटीआय अर्ज प्राप्त झाले. तत्पूर्वी २०१४-१५ साली १२६७४ आणि २०१३-१४ मध्ये हेच प्रमाण अवघे ७०७७ एवढे होते. २०१२-१३ या वर्षात ५८२८ आरटीआय याचिका मिळाल्या. २०१३ ते २०१८ या काळात प्राप्त झालेले आरटीआय अर्ज आणि फेटाळण्यात आलेले अर्ज याविषयी पीटीआयने माहिती मागविली होती. त्यास पीएमओने विस्तृत उत्तर दिले आहे. २०१६-१७ मध्ये १३०६ आरटीआय अर्ज फेटाळण्यात आले आहेत. २०१५-१६ व २०१४-१५ या दोन वर्षांत हेच प्रमाण अनूक्रमे २२३४ आणि २७९५ असे होते. माहिती अधिकार अधिनियमातील तरत्ुदीनुसारच, माहिती देण्यास नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad