२०१७ मध्ये २७ लाख भारतीयांना क्षयरोग - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2018

२०१७ मध्ये २७ लाख भारतीयांना क्षयरोग


मुंबई - गेल्या वर्षी जगभरातील १ कोटी लोकांना क्षयरोगाची(टीबी) लागण झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून समोर आली असून यापैकी जवळपास २७ टक्के म्हणजेच २७ लाख रुग्ण हे भारतातील असल्याचेही यात म्हटले आहे.

डब्ल्यूएचओच्या मंगळवारी जारी झालेल्या ग्लोबल ट्युबरक्लोसिस अहवालानुसार २०१७ मध्ये जगभरातील १ कोटी लोकांना क्षयरोगाची लागण झाली. यात ५८ लाख पुरुष, ३२ लाख महिला व १० लाख बालकांचा समावेश आहे. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्ण हे भारत, चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स, पाकिस्तान, नायजेरिया, बांग्लादेश व दक्षिण आफ्रिकेतील आहेत. यापैकी सर्वाधिक २७ लाख रुग्ण भारतातील आहेत. त्यानंतर चीनमधील ९ लाख, इंडोनेशियातील ८ लाख, फिलिपिन्समधील ६ लाख, पाकिस्तानातील ५ लाख, नायजेरियातील ४ लाख, बांग्लादेशातील ४ लाख व दक्षिण आफ्रिकेतील ३ लाख रुग्णांचा यात समावेश आहे. क्षयरोगामुळे दरवर्षी जवळपास ४ हजार जणांचा मृत्यू होतो, असेही यात म्हटले आहे. जगभरात विविध आजारांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंसाठी कारणीभूत ठरणाऱ्या रोगांमध्ये क्षयरोग दहाव्या क्रमांकावर आहे. क्षयरोगावर नियंत्रणसाठी भारत सरकारकडून व्यापक पातळीवर प्रयत्न केले जात असून या रुग्णांना सरकारकडून मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात. मात्र तरीही जगातील क्षयरुग्णांमध्ये भारतीयांची संख्या बघता अजून बराच मोठा पल्ला आपल्याला गाठावा लागणार असल्याचे दिसत आहे. क्षयरोगाविषयी सरकारकडून व्यापक जनजागृतीही केली जाते. यावर नियंत्रणासाठी क्षयविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याची गरज असल्याचेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Post Bottom Ad