फेसबुकवर हॅकर्सचा हल्ला

Anonymous
वॉशिंग्टन - फेसबुकची तब्बल ५ कोटी अकाऊंट हॅक झाली आहेत. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये भारतीय अकाऊंटचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. फेसबुकच्या View as या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा गैरफायदा घेत हॅकर्सने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती खुद्द कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी दिली. हॅक झालेली पाच कोटी खाती नेमकी कोणत्या देशातील असल्याचं मात्र फेसबुककडून जाहीर करण्यात आलेलं नाही. जगभरात फेसबुकचे २ अब्जाहून अधिक युजर्स आहेत. यात सर्वाधिक २७ कोटी युजर्स हे भारतात आहेत. त्यामुळे हॅक करण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये भारतीय अकाऊंटचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं बोललं जात आहे. फेसबुकने वर्षभरापूर्वी view as हे फिचर सुरू केलं होतं. या फिरच्या सुरक्षेमध्ये असलेले दोष हेरून हॅकर्सने ५ कोटी अकाऊंटमध्ये प्रवेश केल्याचं फेसबुकच्या निदर्शनास आलं. फेसबुकचं View as हे फिचर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. युजर्सला आपला पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचं सांगत झुगरबर्गने युजर्सला आश्वस्त केलं आहे.