Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पीपीएफ, बचत खात्यांच्या व्याजदरात वाढ


नवी दिल्ली - महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पीपीएफसह अन्य अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे किसान विकास पत्रावर ७.७ टक्के व्याज देण्यात येणार असून खास मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर ८.५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदरात ७.८, ७.३ आणि ८.७ टक्के, पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा व्याजदर आठ टक्के, एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर ०.३ टक्के जास्त व्याज मिळणार आहे.

अल्पबचत योजनांवरील व्याजदरात दर तिमाहीत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढत असून त्याचा थेट परिणाम महागाईवर होत आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलंमडले आहे. या पार्श्वभूमीवर नोकरदार, कर्मचारी, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने बचत खात्याच्या व्याजदरात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. उलट, जानेवारी ते मार्च २०१८च्या तिमाहीत व्याजदर कमी करण्यात आले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी होती. नव्या निर्णयामुळे ती दूर होणार आहे. २०१६ मध्ये तिमाही दराच्या संदर्भात अर्थ मंत्रालयाने म्हटले की, त्या वेळच्या अल्पबचत योजना या सरकारी बॉण्डशी संलग्न होत्या. बँकांमध्ये ठेवींवरील दरांमध्ये वाढवलेल्या दरांनुसार ही वाढ केली गेली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार विविध योजनांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी म्हणजे १ ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबर या कालावधीसाठी हा व्याजदर वाढवलेला आहे, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले. पाच वर्षांच्या मुदत ठेवींसाठी, रिकरिंग (आवर्त) ठेवींसाठी, बचत योजनांसाठी व ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांसाठी हा दर अनुक्रमे ७.८ टक्के, ७.३ टक्के व ८.७ टक्के असा असणार आहे. सर्वसाधारण बचत खात्यांचा व्याजदर मात्र वार्षिक ४ टक्के हा कायम ठेवला आहे. पब्लिक व्हिडंट फंड (पीपीएफ) व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) याच्यासाठी वार्षिक व्याजदर ८ टक्के मिळेल. या आधी तो ७.६ टक्के होता. किसान विकास पत्रांसाठी (केव्हीपी) व्याजदर ७.७ टक्के असेल. त्यांची या आधी असणारी कालमर्यादा ११८ महिन्यांऐवजी ११२ महिने करण्यात आली आहे. कन्या बचत योजना सुकन्या समृद्धी खात्यासाठी आता ८.५ टक्के व्याजदर असून हा दर सध्याच्या दरापेक्षा ०.४ टक्के वाढवण्यात आला आहे. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर ०.३ टक्के इतका व्याजदर वाढवला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom