धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

19 September 2018

धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग


नवी मुंबई - हार्बरने प्रवास करणाऱ्या विदेशी तरुणीचा व तिच्या मैत्रिणीचा दोघा अज्ञात तरुणांनी धावत्या लोकलमध्ये विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघे तरुण सर्वांदेखत अश्लील चाळे करत असताना प्रवास करणाऱ्या एकाही पुरुषाने पीडित तरुणीला मदत केली नाही. याबाबत पीडितेने सोशल मीडियावर माहिती प्रसारित केल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी घटनेतील आरोपी तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी फिनलॅण्ड येथील असून ती मुंबईतील टाटा इ्स्टिटट्युट ऑफ सोशल सायन्समध्ये शिक्षण घेत आहे. ही तरुणी सोमवारी दोन मैत्रिणींसह रबाळे येथे अभ्यास दौऱ्यासाठी गेली होती. संध्याकाळी त्या ट्रान्स हार्बरने वाशी रेल्वे स्थानकात आल्या. त्यानंतर त्यांनी गोवंडी येथे जाण्यासाठी वाशी रेल्वे स्थानकातून लोकल पकडताना घाईत महिलांच्या डब्याऐवजी वेगवेगळ्या जनरल डब्यात प्रवेश केला. यावेळी पुरुषांच्या डब्यातील दोघा तरुणांनी विदेशी तरुणीची छेड काढून तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने प्रतिकार केला. मोबाइलने आरोपीचे फोटोदेखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तरुणांनी पीडितेला धमकावले.

Post Top Ad

test