प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबवा

Anonymous
मुंबई - राज्यात प्लास्टिक बंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करुन राज्यातील प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबविण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.

मंत्रालयात राज्यातील प्लास्टिक बंदीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. प्लास्टिक बंदी मोहीम सुरु असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैयक्तिक कारवाईची मोहीम सुरु करावी, असेही श्री. कदम यांनी यावेळी सांगितले.