चौपाटीवर स्ट्रिंग- रे मासे, मुंबईकरांनी घाबरू नये - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

21 September 2018

चौपाटीवर स्ट्रिंग- रे मासे, मुंबईकरांनी घाबरू नये


मुंबई  पाच वर्षापूर्वी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील चौपाट्यांवर थैमान घालणा-या स्टिंग-रे मासे पुन्हा एकदा गिरगाव चौपाटीवर आढळले आहेत. त्यामुळे रविवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतींचे विसर्जन करताना काळजी घ्या. स्टिंग-रे माशाचा दंश वेदनादायी असतो, मात्र घाबरून जाऊ नये, असे पालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत, लाखो मुंबईकर रविवारी मुंबईतील चौपाट्यांवर लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी एकत्र येतील. अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौपाट्या लोकांनी अक्षरक्ष: फुलून जातात. तहान-भूक हरपून मुंबईकर बाप्पाला निरोप देण्यासाठी जमतात. पण, गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर जाल तेव्हा जरा सावध रहा. पावसाळा कमी झाला की ‘स्टिंग-रे’ मासा प्रजननासाठी किनाऱ्यावर येतो. यंदाही मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर ‘स्टिंग-रे’ मासे आढळून आलेत. ‘स्टिंग-रे’चा दंश वेदनादायी असतो. त्यामुळे विसर्जन करताना काळजी घेणे आवश्यक आहे. 2013 मध्ये मोठ्या प्रमाणात ‘स्टिंग-रे’ मुंबईच्या चौपाट्यांवर आढळून आले होते. त्यावेळी सुमारे दिडशे गणेशभक्तांना ‘स्टिंग-रे’ माशाने दंश केला होता. यंदाही गिरगाव चौपाटीवर ‘स्टिंग-रे’ दिसल्याची माहिती मिळाली आहे. विसर्जनासाठी चौपाटीवर प्रचंड गर्दी होते. लाखो गणेशभक्त पाण्यात उतरतात. अशावेळी ‘स्टिंग-रे’ च्या शेपटीवर चुकून पाय पडल्यास तो दंश करण्याची शक्यता असते. हा ‘स्टिंग-रे’ माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे त्यांच्या शेपटीत न्यूरोटॉक्सिन असते. या माशाचा दंश वेदनादायक असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विविध चौपाट्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत. सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. पण, गणेशभक्तांनी सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी. मासे पायाला चावल्यावर त्या भागात जळजळ होत असल्याने ते खाजवू नयेत, त्यामुळे जखम खोल होऊ शकते. याकरीता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे पालिकेच्या आरोग्य विभागाक़डून सांगण्यात आले.

गिरगाव चौपाटीवर स्ट्रिंग - रे मासे आढळले आहेत. मात्र या माशाने दंश केल्यास वेदना होतात. काळजी घ्यावी, मात्र घाबरण्याचे कारण नाही असे पालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले आहे. विसर्जनाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, पालिकेचे डॉक्टर्स आणि वेदनाशामक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पालिका आणि आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे. 

Post Top Ad

test