अंधेरी आगीत दहावा मृत्यू

Anonymous

मुंबई - अंधेरीतील कामगार हॉस्पिटलला लागलेल्या आगीतील जखमींपैकी आणखी एका रुग्णाचा आज (गुरुवार, २० डिसेंबर) सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेले दत्तू किसन नरवडे (६५) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १० वर गेली आहे.

अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयात सोमवारी सायंकाळी आग लागली होती. या आगीमध्ये १७७ जण जखमी झाले तर आठ जणांचा मृत्यू झाला होता. काही जणांवर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
काल बुधवारी उपचारादरम्यान सेव्हन हिल रुग्णालयात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. शीला मार्वेकर असे या महिलेचे नाव आहे. आज सकाळी दत्तू नरवडे यांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या दहा झाली आहे.
Tags