कामगार रुग्णालय आग प्रकरण - पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले

Anonymous

मुंबई - अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये १७७ जण जखमी झाले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस करत असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

अंधेरी कामगार रुग्णालयाला सोमवारी सायंकाळी आग लागली. या आगीमध्ये १७७ जण जखमी झाले. त्यांना कूपर, होली स्पिरीट, बाळासाहेब ठाकरे ट्रोमा आणि सेव्हन हिल. सिद्धार्थ रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत सोमावरी ८ जणांचा मृत्यू झाला होता. शैला मूर्वेकर या महिलेचा आज बुधवारी मृत्यू झाला आहे. यामुळे या अगीमधील मृतांची संख्या आता ९ झाली आहे. या आगीच्या घटनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एसीचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

 


Tags