गोरेगावमध्ये इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू


मुंबई - गोरेगाव पश्चिम येथील बांधकाम सुरू असलेल्या दोन मजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. जुन्या घराच्या जागेवर दुरुस्तीचे बांधकाम सुरू असतांना ही घटना घडली आहे. गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरातील ही दोन मजली इमारत आहे. या इमातरतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडल्याची भीती माहिती मिळाली होती. या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, त्यांनी जवळपास चार तासाच्या अथक प्रयत्नांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले आहे. या इमारत कोसळून जखमी झालेल्यांना तात्काळ सिद्धार्थ रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. रामू असे मृत व्यक्तीचे नाव असून तो २२ वर्षांचा होता. या इमारतीत एकूण ११ कामगार आणि त्यांचे कुटुंबिय काम करत होते. २२ वर्षीय रामू नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर इतर ८ जण जखमी आहेत. मंगल बनसा(३५), मुन्ना शेख(३०), शिनू (३५), हरी वडार (३), शंकर पटेल(२१), सरोजा वडार(२४), रमेश निशाद (३२) जखमींची नावे आहेत.
Tags