मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न


मुंबई - मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात पुन्हा एका तरुणाने मंत्रालयावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीमुळे तरुण सुरक्षित वाचला आहे. लक्ष्मण चव्हाण असं या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो प्रजासत्ताक भारत या पक्षाचा कार्यकर्ता आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

आत्महत्या करणारा तरुण प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता आहे. तिसऱ्या मजल्यावरुन त्याने उडी मारली मात्र जाळीत अडकल्याने त्याचे प्राण वाचले.पोलीस आणि अन्य एका माणसाच्या प्रयत्नाने त्याला खाली काढण्यात आले. लक्ष्मण चव्हाण हा पुण्याच्या कोथरुड येथील रहिवासी आहे. शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, कुपोषण आणि बालमृत्यू जोपर्यंत थांबत नाहीत, तो पार्यंत मुख्यमंत्र्यांनी व्हीव्हीआयपी सुविधा घेऊ नये, सरकारी निवास स्थानात राहू नये, महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करावे अशी मागणी त्याने केली आहे.