बेस्टच्या संपाचा मोनोला फायदा

मुंबई - मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या बेस्ट कामगारांच्या संपाचा फायदा तोट्यातील मोनोला झाला आहे. वडाळा ते चेंबूर मार्गावर धावणा-या या मोनोरेलला संपाच्या तीन दिवसांत प्रवासी वाढून ४,८७,०६० रुपयाचा महसूल मिळाला. त्यात मोनोला १ लाख ९३ हजार ६४४ रुपयाचा फायदा झाला आहे. 

मागील मंगळवारपासून सुरु झालेल्या संपानंतर मुंबईकरांचे हाल सुरु आहेत. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेली बेस्ट संपावर गेल्याने मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी व इतर खासगी वाहनांसह मोनोचाही आधार घेतला आहे. मोनो सुरु झाल्यापासून प्रचंड तोटयात आहे. मात्र बेस्टच्या संपाचा फायदा मोनोला झाला आहे. ८, ९ व १० जानेवारी या संपाच्या तीन दिवसांत मोनोतून ७२,२४९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यात मोनोच्या महसूलात ४,८७,०६० लाख रुपयाची भर पडली. संपापूर्वीच्या तीन दिवसांत ४१ हजार ९५४ इतक्या प्रवाशांनी प्रवास केला. त्यात २ लाख ९३ हजार, ४१६ रुपये इतका महसूल मिळाला. त्यामुळे संपापूर्वी व संपा दरम्यान तुलना केल्यास मोनोला बेस्ट संपा दरम्यान तीन दिवसांत एक लाख ९३ हजार ६४४ रुपयाचा महसूल वाढला आहे.
Tags