भाजपच्या पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट?


मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे, मात्र या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील पाच ते सहा विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली फेरी पूर्ण झाली असून आता दुसरी फेरी होणार आहे. या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शाह सीट टू सीट चर्चा करणार आहेत. शिवसेनेसोबतच्या युतीनंतर भाजप महाराष्ट्रात लोकसभेच्या 25 जागा लढवणार आहे, मात्र त्यापैकी पाच विद्यमान खासदारांना वगळले जाईल, असे म्हटले जात आहे. सध्या ईशान्य मुंबईच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद आहे. किरीट सोमय्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे. शिवाय भाजपच्या विद्यमान आमदारांचाही सोमय्यांना विरोध असल्याचे कळते. किरीट सोमय्या पुन्हा निवडून येण्याबाबत भाजपमध्ये साशंकता आहे.