मोदींसाठी काँग्रेसचे चक्रव्यूह तयार


मुंबई (प्रतिनिधी) - शनिवारी टिळक भवन येथे पार पडलेल्या सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने खास रणनीती तयार केली यात भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खास चक्रव्यूह तयार करण्यात आला आहे. या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या बैठकीला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे निरीक्षक मधुसुदन मिस्त्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, सुरेश शेट्टी, अमरीश पटेल, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी खासार राजीव सातव, हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील, आमदार वर्षा गायकवाड, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, संपत कुमार, बी. एम. संदीप, माजी मंत्री बस्वराज पाटील, कृपाशंकर सिंह, आमार विश्वजीत कदम, पी. एन. पाटील आदी उपस्थित होते.