जैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ - अमृता फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2019

जैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ - अमृता फडणवीस


मुंबई - जैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशीभावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीर जयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथीलसर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोजकोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजाला शुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञानआणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे.समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्ये कमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांतीआपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते. जैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणीआचरणात आणणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसारआपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्य मुंबईचेभाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.

Post Bottom Ad