उमेदवारी अर्ज भरताना गोपाळ शेट्टी यांचे शक्तिप्रदर्शन

JPN NEWS


मुंबई - भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार गोपाळ शेट्टी यांनी मंगळवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. त्यापूर्वी त्यांनी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्या चाहत्यांची आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.