कांदिवली येथे घराची भिंत कोसळून तरुणाचा मृत्यू,

मुंबई - कांदिवली पश्चिम येथे घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. जखमीला जवळील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

कांदिवलीतील इंदिरा नगर, लालजी पाडा येथील साईनाथ स्वीट मार्ट जवळ रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घराचे बांधकाम सुरू असताना अचानक भिंतीचा भाग कोसळला. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी धावपळ करीत बचावकार्य सुरू केले. मात्र या दुर्घटनेत रमेश मिंग (१८) या तरुणाचा मृत्यु झाला. तर सुमित लकडा (२८) हा जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Tags