मनोज कोटक यांचा विजय देशाला विकासाकडे नेईल - लीलाधर ढाके


मुंबई - युतीला मिळणारे प्रत्येक मत हे थेट नरेंद्र मोदींना मिळणार असून 2019 ची ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाखाली जर युतीचे सरकार आले तर विकासाचा वारूचौफेर उधळेल अन्यथा देश विघातक शक्तींच्या हातात जाण्याचा धोका आहे असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर ढाके यांनी व्यक्त केले.
 
भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पक्ष युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तसेच ईशान्य मुंबई जिल्हा लोकसभा मतदार संघाच्या युतीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी हे बोलतहोते. शिवसेना भाजपा ची युती ही राजकारणाच्या पलीकडे जावून नैसर्गिक तत्वावर आधारित आहे आणि राष्ट्रभक्तीच्या सूत्रात गोवली आहे. ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यावरश्रद्धा ठेवणारा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रत्येक कार्यकर्ता युतीचे उमेदवार मनोज कोटक यांना विजयी करण्यासाठी प्राणाची बाजी लावेल. 

ईशान्य मुंबई हा युतीचा बालेकिल्ला असून या मतदार संघाने या आधी प्रमोद महाजन, जयवंतीबेन मेहता, किरीट सोमैया या भाजपा नेत्यांना लोकसभेत पाठविले आहे याची आठवण करून देतगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मनोज कोटक हे याच परंपरेचा एक भाग बनतील अशी आशा व्यक्त केली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा सन्मान व वंचित तसेच दलित समाजालान्याय देण्याचे काम गेल्या पाच वर्षात मोदी सरकारनेच केले आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी (आठवले) सर्व शक्तिनिशी युतीच्या व मनोज कोटक यांच्या मागे उभी राहील अशी निसंदीग्ध ग्वाही आरपीआयचे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर यांनी दिली. 

मनोज कोटक हे सक्षम, मेहनती व अभ्यासू कार्यकर्ते असून त्यांना जिंकून आणण्याची जबाबदारी आपल्या सकट माझी आहे अशा भावना खासदार किरीट सोमैया यांनी बोलून दाखवली तर संपूर्णमतदार संघात युतीसाठी सकारात्मक वातावरण असून विरोधक आपले डिपोसीट वाचावण्यासाठी लढत आहेत असा टोला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी लगावला. 

मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ताअसून कोणताही वारसा नसताना पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली याबद्दल पक्षाचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत असतानाच उमेदवार मनोज कोटक यांनी असे फक्त भाजपामध्येच घडू शकते, याच पक्षात सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधि मिळू शकते व संघटनेच्या शक्तीच्या जोरावर एक सामान्य कार्यकर्ता देखील खासदार बनु शकतो हे ठासून सांगितले. 

घाटकोपर येथील भानुशाली वाडी येथील आयोजित केलेल्या युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या पाहिल्याच युतीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात युतीचे सर्व आमदार,नगरसेवक, माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते विशेषता: महिलांची संख्या लक्षणीय होती. यासभेत राष्ट्रवादी कोंग्रेसचे माजी नगरसेवक नंदकुमार वैती यांनी भाजपा मध्येआपल्या शेकडो कार्यकर्त्यासह प्रवेश केला.