माझा भाऊ तुम्हाला कधीही निराश करणार नाही, त्याची काळजी घ्या !


नवी दिल्ली - “माझा भाऊ, माझा एक सच्चा मित्र, माझ्या माहितीतला आतापर्यंतचा सर्वात शूर व्यक्ती, वायनाडच्या रहिवाशांनो त्याची काळजी घ्या. तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही”, असे भावनिक आवाहन पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी वायनाडच्या जनतेला केले आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी (४ मार्च) वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
Tags