Type Here to Get Search Results !

प्रकाश आंबेडकर भाजप, संघाला मदत करतात - मिलिंद पखाले


नागपूर - वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही निवडणुकीत भाजपला जिंकविण्यासाठी करण्यात आली, प्रकाश आंबेडकर हे थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करतात, असा असा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रवक्ता मिलिंद पखाले यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिलिंद पखाले यांनी आज पूर्व विदर्भातील अनेक नेत्यांसोबत पक्ष सोडला. यावेळी बोलतना त्यांनी हा आरोप केला आहे. यावेळी बोलताना अनेक वर्षांपासून मी पक्षात काम करत असून यंदाची निवडणूक ही अटीतटीची होती. मात्र, पक्षाने आवश्यक ती मेहनत घेतली नाही. कारण पक्षाअंतर्गत भाजपला मदत केली गेली. राज्यात ताकद नसताना देखील राज्यातील ४७ जागावर उमेदवारांना रिंगणात उतरवून त्यांनी आरएसएसला सरळ पाठिंबा दिला. भाजपच्या विजयासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितांची मते खाण्याचे काम केले. वंचित बहुजन आघाडीच्या ४७ जागांपैकी एकही जागा लोकसभेच्या निवडणूकीत निवडणून येणार नसल्याचे पखाले यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad