पालिकेचे “मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल”

JPN NEWS

मुंबई - मुंबई महापालिकेने सन २०२५ पर्यंत “क्षयमुक्त भारत” या भारत सरकारच्या घोषणेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने “मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल” योजना आखली आहे. तसा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या हस्ते बुधवारी, महापालिका मुख्‍यालयातील महापौर दालनात प्रकाशन करण्यात आले. 

सन २०१३ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने “मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल” ही घोषणा केली होती. सन २०२५ पर्यंत “क्षयमुक्त भारत” या भारत सरकारच्या घोषणेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने कृती आराखडा तयार करून ‘क्षयमुक्त मुंबई योजना २०१९-२०२५’ आखली. हा आराखडा केंद्रीय क्षयरोग विभाग, राज्य क्षयरोग विभाग व इतर सहकारी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या कृतीयोजनेमध्ये रोगप्रतिबंध व सर्व सुविधांचे बळकटीकरण करणे यावर भर देण्यात आला आहे. याचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी सुधार समिती अध्‍यक्ष सदानंद परब, महिला व बालकल्‍याण समिती अध्‍यक्ष हर्षला मोरे, नगरसेवक राजू पेडणेकर तसेच अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त डॉ.अश्वि‍नी जोशी, उप आयुक्‍त सुनिल धामणे, कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर आदी उपस्थित होते.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !