कोकणासाठी मध्य रेल्वेच्या ६ गणपती स्पेशल ट्रेन

Anonymous

मुंबई - बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेश भक्तांना लागले असून गणपतीत कोकणात जाणार्या भक्तांची गदी लक्षात घेता अतिरिक्त ६ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे- सावंतवाडी रोड - एलटीटी दरम्यान गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. दरम्यान, या विशेष गाड्याचे आरक्षण २५ आँगस्टपासून सुरु होणार आहे.

पुणे - सावंतवाडी रोड (२) ०१२२१ ही विशेष गाडी पुणे येथून २९ आँगस्टला दुपारी १२.१० वाजता सुटणार असून दुसर्या दिवशी पहाटे ४ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे. लोणावळा, कल्याण, पनवेल,रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, कणकवली, सिंधुदुगॅ, कुडाळ, व झाराप या स्थानकावर थांबणार आहेत. तर ०१२२२ ही सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टमिॅनस ही विशेष गाडी ३० आँगस्टला पहाटे ५.२० ला सावंतवाडी रोड येथून सुटणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ४.५० वाजता एलटीटी पोहोचेल. झाराप, कुडाळ, सिंधुदुगॅ, कणवकवली, नांदगाव, वैभववाडी, राजापुर रोड, विलवडे, आडीवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे या स्थानकांवर थांबणार आहे. या विशेष गाडीला २२ डबे जोडण्यात आले आहेत.

गाडी नंबर ०१२२३ ही विशेष गाडी ३० आँगस्टला संध्याकाळी ५.५० ला एलटीटीहुन सुटणार असून दुसर्या दिवशी पहाटे ६.३० ला सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुगॅ, कुडाळ व झाराप या स्थानकांवर थांबणार आहे.

तर गाडी नंबर ०१२२४ ही विशेष गाडी ३१ आँगस्टला सकाळी १०.५५ ला सावंतवाडी रोड येथून सुटणार असून त्याच दिवशी रात्री ११.४० ला पनवेल स्थानकात पोहोचणार आहे. झाराप, कुडाळ, सिंधुदुगॅ, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळुण, खेड, वीर माणगाव, रोहा या स्थानकात थांबणार आहेत.

गाडी नंबर ०१२२५ ही विशेष गाडी १ सप्टेंबरला मध्यरात्री १२.५५ ला पनवेलहुन सुटणार असून त्याच दिवशी दुपारी २.१० ला सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे. रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावडेॅ, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुगॅ, कुडाळ ल झाराप या स्थानकांवर हाॅल्ट दिला आहे.

गाडी नंबर ०१२२६ ही विशेष गाडी १ सप्टेंबरला दुपारी ३.२० ला सावंतवाडी रोड येथून सुटणार असून दुसर्या दिवशी पहाटे ७.२५ ला पुण्याला पोहोचणार आहे. झाराप, कुडाळ, सिंधुदुगॅ, कणकवली, वैभववाडी, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळुण, खेड, वीर माणगाव, रोहा, कल्याण, लोणावळा या स्थानकात थांबणार आहेत.

आरक्षण २५ आँगस्टपासून -
मध्य रेल्वे प्रशासनाने कोकणासाठी गणपती उत्सवासाठी खास २५ आँगस्टपासून विशेष शुल्कासह या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. सेकंड क्लास डब्यासाठी तिकीट आरक्षणाची गरज नसून प्रवाशाच्या आधी तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जन संपकॅ अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.