मुसलमानांसाठी भारतासारखा देश मिळू शकत नाही - शाहनवाज हुसैन

Anonymous
मुंबई - पूरग्रस्तांच्या पाठी सर्व देश, सर्व समाज उभा आहे यात मुस्लिम समाज कुठेही मागे राहणार नाही, तर कोल्हापूर , सांगली, सातारा भागात आलेल्या महापुरानंतर त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. कारण हिंदुस्तानी मुसलमानांसाठी भारतासारखा देश, हिंदूंच्यासारखा मित्र आणि मोदी सारखा नेता मिळू शकत नाही असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते शाहनवाज हुसैन यांनी बांद्रा पश्चिम येथीम राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना केले.

प्राणाची बाजी लावून लाखो जीव वाचवणाऱ्या वीर जवानांना मुस्लिम दहीहंडी पथकाने मानवी मनोरा रचून सलामी देखील दिली. यावेळी बोलताना राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थेचे तसेच राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी पुरग्रासतांना मदत तर पाठवलीच सोबत १०० पेक्षा अधिक प्लंम्बर , कडीया, पेंटर, सुतार काम करणाऱ्या लोकांच्या चमुला देखील रवाना केले.

राज्याचे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नवभारतीय शिववाहतुक संघटना पुरग्रसतांना मदत पाठवू इच्छिणाऱ्या लोकांना मोफत ट्रक आणि टेम्पो देखील देणार आहेत. राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थेच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी इरफान कुरेशी, नवभारतीय शिववाहतुक संघटनेचे कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, सरचिटणीस विनय मोरे यांच्या समवेत हजारो मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते हजर होते.